तू...

तुझं गाणं आवडत होतं मला; पण तुझ्या गाण्याचे शब्द बनणं नाकारलं मी... असशीलही तू गंधर्व... पण म्हणून किन्नरांना कमी लेखणं शोभले नाही तुला.... ज्या शब्दांनी कविता रचलीस ते तुझे कधीच नव्हते.... शब्दांवर कोणाची मालकी नसते हे कळून चुकलेला तू तुझ्याजवळ तुझ्या शब्दांच्या असण्याचा अट्टाहास कधीच सोडला नाहीस... स्वतःच्या वाटेवर चालायचं होतं न तुला... मग या मळलेल्या, चिखलाच्या वाटेवर काय करतोयस पुन्हा... फक्त सुरात अडकणारा तू आज रस्ता कोणता पकडावा ह्या कोड्यात का अडकलास....

                               _@shivadnya_

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Relationship check!

Last call....

आभाळमाया