Last call....

               माझ्या आजूबाजूची एवढी सगळी माणसं माझ्याकडे इतक्या भयंकर सहानुभूतीच्या नजरेने का पाहत होती हे मला अजूनही कळलेलं नाही. मी चोरी वगैरे तर कधी केली नव्हती पण माझ्याकडेच निरखून पाहणाऱ्या त्या दुकानदार काकांचे 2₹ चुकून माझ्याकडेच राहून गेले असल्याची जाणीव काही मला शांत बसू देईना. मी सांगणारच होते त्यांना पण जातं ना राहून गडबडीत. मलापण असतात कामं!! असो. नंतर देईनच की त्यात काय एवढं..!!!!
          Actually मला प्रचंड राग आला होता दुसऱ्याच्या रूम मध्ये घुसून त्याला श्वास सुद्धा घेता येऊ नये याची तजवीज करणाऱ्या या माणसांचा.... ह्याला काय अर्थ आहे?!! मी चिडून आईला हाक मारणार इतक्यात बाहेरून सौमित्र धावत आला. अरे देवा! हा इथे काय करतोय! आईने बघितलं तर फाडुनच खाईल मला. मूर्खा जा आधी इथून...!!!!
          मी खुणावत होते त्याला पण तो असा विचित्र, डोळे फाडून, लाल नजरेने माझ्याकडे बघत होता की मला क्षणभर भीतीच वाटली. हा पुन्हा पिऊन आला की काय! मी रागानेच त्याला विचारायला जाणार इतक्यात अपूर्वाssssssss!!!!!!!!!!  तो इतक्या मोठ्याने का किंचाळला हे ही मला कळलेलं नाही. म्हणजे हे असलं काहीतरी विचित्र वगैरे मी स्वप्नं पडल्यावर वागते.
             मला जगातली भयंकर, अनाकलनीय स्वप्नं पडतात हे ह्या सौमित्रचंच मत! पण काय करू ? त्याला सांगितल्याशिवाय मला राहवतच नाही. फार गूढ नसतात ती.त्यात फारतर एवढंच असतं! 'माझ्या बोटातली त्याने दिलेली अंगठी अचानक सैल होते, पडते घरंगळत जाते. मी ती पकडण्यासाठी धावत राहते. पण ती दूर जातेय... मी धावतेय, ती घरंगळतेय.... हेच हेच हेच!!! '
           मी थकलेय तरीही ती अंगठी हवीय मला n yesss फायनली मला ती सापडते. मी ती घेते आणि मागे वळते.अरे! हे काय???? मला फक्त सावल्या दिसतात माणसांच्या. लहानपणापासून एवढं नक्कीच शिकलेय की माणूस असल्याशिवाय त्याची सावली पडत नाही! मग मी माणसं शोधू लागते. मला भीती वाटते. थोडीशीच कारण हे काहीतरी त्या काल रात्री बघितलेल्या हॉरर मुव्ही सारखं दिसतंय. ती माणसं sorry सावल्या माझ्याजवळ येतात. मी घाबरून मागे जात राहते. दरीच्या टोकावर येऊन पोहोचते... पाय सरकतो आणि ; सौमित्रssssssss...!!!!! इतकंच!
          आता ह्या स्वप्नात काय गूढ वगैरे असणार आहे? हा कधीतरी असतात अशी!! म्हणजे मी स्वप्नात देवळातल्या घंटा वाजवत असते. अख्खा गाव गोळा झाला की थांबते. हळूहळू गाव उठतो, जवळ येऊ लागतो! त्यांची नजर माझ्या कपड्यांपलीकडे मला शोधू लागते. विलक्षण शिसारीने मी लांब जाते. खूप लांब, त्या तिकडे, देवळाच्या मागे तो समुद्र, तो जिथे मिळतो त्या आकाशाला, तिथपर्यंत.... गाव आता तिथेतर नाही येऊ शकत. लांबूनच काहीजण मला हाक मारताहेत जवळ येण्यासाठी. छे!!!! मी कसली ऐकतेय त्यांचं. ...!
         मला ते बोलवताहेत... पावसाचे थेंब, वाफेचे ढग, उन्हाची किरणं, सुकलेली पानं, तो वारा, ते वादळ, तो पाऊस... ते ते सगळं!!! Peaceful...!!! That's what I ever wanting...!!!!😊
     अपूर्वा.... अपूर्वा... मी आलोय! सौमित्र.. आपल्याला psychologist कडे जायचंय. स्वप्नांवर इलाज करण्यासाठी... Let's go!! 
           पण मला उठता येत नाहीये... मला खरंच उठता येत नाहीये! मी फक्त बघू शकतेय... त्यांच्याकडे ज्यांच्या डोळ्यात पाणी आहे, जी विचित्र आवाजात रडताहेत. त्या सगळ्या गोंगाटात मला सौमित्र चा आवाज मात्र स्पष्ट ऐकू येतोय. अपूर्वा!! तो तुझा last call असूच शकत नाही..!!! आणि मला आता त्याला सांगायचंय... तू माझा last call receive करूच शकला नाहीस....

                      ©Shivadnya

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Relationship check!

आभाळमाया