शोध का?

एका शांत नदीकिनारी उभी असलेली ती शोध घेत होती... का या प्रश्नासोबत येणाऱ्या उत्तरांचा....

शोधत होती ती तिच्या आयुष्यात माणसांच्या असण्याने तिच्या जगण्याचे संदर्भ बदलतात का आणि बदलतात तर ते का या प्रश्नांची उत्तरं....

शोधत होती ती तिच्या आयुष्यात कोणाच्या असण्या नसण्याने फरक पडतो का आणि पडतो तर का या प्रश्नांची उत्तरं...

शोधत होती ती प्रेम अस्तित्वातच असतं का आणि असतं तर का या प्रश्नांची उत्तरं....

शोधत होती ती ज्या प्रश्नांची उत्तरं ते प्रश्न तिलाच पडतात का आणि पडतात तर का या प्रश्नांची उत्तरं....

                              @shivadnya

_'कारण अंधार आहे म्हणून एकाच जागी खितपत पडण्यापेक्षा; चाचपडत का होईना पण वाट शोधणं महत्वाचं..'_
_नाही का?_😊

           @राधेय...

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Relationship check!

Last call....

आभाळमाया