Posts

Showing posts from April, 2018

रातांधळी

पात्रं होती ती... कोड्यात गुंतलेली... विचारांचं विवर खेचून घेत होतं तिला आतल्याआत.... आशेचा किरण नसलेल्या निराशेच्या गर्तेतलं एकाकीपण खरवडून काढत होती तिची तत्त्वं ... संवेदनांच्या खोल दऱ्यांमध्ये आक्रोशाणारा तिचा आवाज फक्त तिलाच ऐकू येतोय.... पडसाद उमटताहेत; पण प्रतिसाद नाही.... विझलेला दिवा.... थकलेली नजर... हरलेलं शरीर घेऊन किर्र काळोखाला कापत....माणसांच्या शोधात चाचपडतेय ती.... एक रातांधळी ....                                    @shivadnya

शोध का?

एका शांत नदीकिनारी उभी असलेली ती शोध घेत होती... का या प्रश्नासोबत येणाऱ्या उत्तरांचा.... शोधत होती ती तिच्या आयुष्यात माणसांच्या असण्याने तिच्या जगण्याचे संदर्भ बदलतात का आणि बदलतात तर ते का या प्रश्नांची उत्तरं.... शोधत होती ती तिच्या आयुष्यात कोणाच्या असण्या नसण्याने फरक पडतो का आणि पडतो तर का या प्रश्नांची उत्तरं... शोधत होती ती प्रेम अस्तित्वातच असतं का आणि असतं तर का या प्रश्नांची उत्तरं.... शोधत होती ती ज्या प्रश्नांची उत्तरं ते प्रश्न तिलाच पडतात का आणि पडतात तर का या प्रश्नांची उत्तरं....                               @shivadnya _'कारण अंधार आहे म्हणून एकाच जागी खितपत पडण्यापेक्षा; चाचपडत का होईना पण वाट शोधणं महत्वाचं..'_ _नाही का ?_😊            @ राधेय ...

तू...

तुझं गाणं आवडत होतं मला; पण तुझ्या गाण्याचे शब्द बनणं नाकारलं मी... असशीलही तू गंधर्व ... पण म्हणून किन्नरांना कमी लेखणं शोभले नाही तुला.... ज्या शब्दांनी कविता रचलीस ते तुझे कधीच नव्हते.... शब्दांवर कोणाची मालकी नसते हे कळून चुकलेला तू तुझ्याजवळ तुझ्या शब्दांच्या असण्याचा अट्टाहास कधीच सोडला नाहीस... स्वतःच्या वाटेवर चालायचं होतं न तुला... मग या मळलेल्या , चिखलाच्या वाटेवर काय करतोयस पुन्हा... फक्त सुरात अडकणारा तू आज रस्ता कोणता पकडावा ह्या कोड्यात का अडकलास....                                _@shivadnya_

पुनर्जन्म

रंगमंचावर जरी नसले तरी त्यावरच्या धुळीमध्ये अस्तित्व आहे माझं अजूनही.... यत्न तर फार केलेस तू मला ती झटकून टाकण्याचे... पण ते जमणं शक्य नव्हतं तुला... माझ्या अस्मितेवर काळे शिंतोडे उडवणारा तुही होतास अन तेही आहेत.... चिता जळेपर्यंत माझी अन अस्मितेचीही.... पण मृत्यूनंतरच्या आयुष्यावर विश्वास आहे माझा.... प्रगाढ आणि।अलवचिक असा....  अदृश्य हातानी उडवल्या काळ्या रंगाचा अंदाज कधीच येणार नाही तुला.... इतकी बेफिकीर नक्कीच नसेन मी....                                      _@shivadnya_