एक निशब्द प्रवास....

एक निशब्द प्रवास...
तिन्हीसांज वेळेचा,
अस्ताबरोबर अस्वस्थतेचा
आरक्त डोळ्यांनी पाहिलेल्या विरक्ततेचा...

एक निशब्द प्रवास...
रिक्त लेखणी आणि कोऱ्या कागदाचा
जीर्ण पान आणि सुकल्या पाकळ्यांचा...

एक निशब्द प्रवास...
दाटल्या आभाळ आणि कोरड्या पावसाचा
आसुसल्या धरती आणि हिरमुसल्या रानवेलीचा...

एक निशब्द प्रवास...
चुकल्या अंदाज आणि भयाण अपघातांचा
मरणासन्न आयुष्य आणि विषण्ण मनांचा...

एक निशब्द प्रवास...
बेभान लाटा आणि वादळी वाऱ्यांचा
संथ तरंग आणि शांत किनाऱ्यांचा...

एक निशब्द प्रवास...
आक्रोशाणाऱ्या सादेचा आणि विरल्या प्रतिसादांचा
बाटल्या स्पर्शाचा आणि लाचार हातांचा...

एक निशब्द प्रवास...
अनोळखी चेहऱ्यांचा आणि ओळखीच्या हाकांचा
मळलेल्या वाटांचा आणि तुडविल्या मातीचा...

एक निशब्द प्रवास...
विस्कटल्या नात्यांचा आणि घुसमटल्या व्यथांचा
अव्यक्त वेदनांचा आणि अबोल भावनांचा...

एक निशब्द प्रवास...
माझ्यातला तुझा आणि तुझ्यातला माझा
न सुटणाऱ्या कोड्यांचा आणि न उमगणाऱ्या संदर्भांचा...

एक निशब्द प्रवास...
सुरुवात आणि शेवटचा...
अनादि आणि निरंतर असा...
एक निशब्द प्रवास...

    
                            © Shivadnya

Comments

  1. Pravas nishadb asla tri mn khup bolat ahe.....
    Vedana lapaun te tyach vatene chalat ahe.....
    Astitwala dukhhachi chadar ghalun te zakle jat nsave.....
    Mhnun te kavitecha rupane swtala mandat asave.....
    Shbdanchi vel aaj tech dukkh gheun ugavli ahe...
    Pn he matr nakki. ..
    Tya velivr anandachi fule lavkarch yenar ahet.....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Relationship check!

Last call....

आभाळमाया