Posts

Showing posts from 2019

Last call....

               माझ्या आजूबाजूची एवढी सगळी माणसं माझ्याकडे इतक्या भयंकर सहानुभूतीच्या नजरेने का पाहत होती हे मला अजूनही कळलेलं नाही. मी चोरी वगैरे तर कधी केली नव्हती पण माझ्याकडेच निरखून पाहणाऱ्या त्या दुकानदार काकांचे 2₹ चुकून माझ्याकडेच राहून गेले असल्याची जाणीव काही मला शांत बसू देईना. मी सांगणारच होते त्यांना पण जातं ना राहून गडबडीत. मलापण असतात कामं!! असो. नंतर देईनच की त्यात काय एवढं..!!!!           Actually मला प्रचंड राग आला होता दुसऱ्याच्या रूम मध्ये घुसून त्याला श्वास सुद्धा घेता येऊ नये याची तजवीज करणाऱ्या या माणसांचा.... ह्याला काय अर्थ आहे?!! मी चिडून आईला हाक मारणार इतक्यात बाहेरून सौमित्र धावत आला. अरे देवा! हा इथे काय करतोय! आईने बघितलं तर फाडुनच खाईल मला. मूर्खा जा आधी इथून...!!!!           मी खुणावत होते त्याला पण तो असा विचित्र, डोळे फाडून, लाल नजरेने माझ्याकडे बघत होता की मला क्षणभर भीतीच वाटली. हा पुन्हा पिऊन आला की काय! मी रागानेच त्याला विचारायला जाणार इतक्यात अपूर्वाssssssss!!!!!!!!!!  तो इतक्या मोठ्याने का किंचाळला हे ही मला कळलेलं नाही. म्हणजे हे असलं काहीतरी

पहारा...

     बोलक्या शब्दांस मुक्या जाणिवांचा पहारा.…      बोलक्या लाटांस स्तब्ध किनाऱ्याचा पहारा...      बोलक्या बटांस सावऱ्या हातांचा पहारा...      बोलक्या ओढीस कळत्या बंधनांचा पहारा...      बोलक्या वाऱ्यास बंद खिडक्यांचा पहारा...      बोलक्या अश्रूंस बंद पापण्यांचा पहारा...      बोलक्या भेटींस सरत्या वेळेचा पहारा..      बोलक्या गझलेस मानी मैफिलीचा पहारा...                © shivadnya

एक निशब्द प्रवास....

एक निशब्द प्रवास.. . तिन्हीसांज वेळेचा, अस्ताबरोबर अस्वस्थतेचा आरक्त डोळ्यांनी पाहिलेल्या विरक्ततेचा... एक निशब्द प्रवास... रिक्त लेखणी आणि कोऱ्या कागदाचा जीर्ण पान आणि सुकल्या पाकळ्यांचा... एक निशब्द प्रवास... दाटल्या आभाळ आणि कोरड्या पावसाचा आसुसल्या धरती आणि हिरमुसल्या रानवेलीचा... एक निशब्द प्रवास... चुकल्या अंदाज आणि भयाण अपघातांचा मरणासन्न आयुष्य आणि विषण्ण मनांचा... एक निशब्द प्रवास... बेभान लाटा आणि वादळी वाऱ्यांचा संथ तरंग आणि शांत किनाऱ्यांचा... एक निशब्द प्रवास... आक्रोशाणाऱ्या सादेचा आणि विरल्या प्रतिसादांचा बाटल्या स्पर्शाचा आणि लाचार हातांचा... एक निशब्द प्रवास... अनोळखी चेहऱ्यांचा आणि ओळखीच्या हाकांचा मळलेल्या वाटांचा आणि तुडविल्या मातीचा... एक निशब्द प्रवास... विस्कटल्या नात्यांचा आणि घुसमटल्या व्यथांचा अव्यक्त वेदनांचा आणि अबोल भावनांचा... एक निशब्द प्रवास... माझ्यातला तुझा आणि तुझ्यातला माझा न सुटणाऱ्या कोड्यांचा आणि न उमगणाऱ्या संदर्भांचा... एक निशब्द प्रवास... सुरुवात आणि शेवटचा... अनादि आणि निरंतर असा... एक निशब्द प्रवास...         

पर्याय

                       चालत्या वाटा जाळून असा कितीसा प्रकाश मिळणार रे... आग विझली की राख ही व्हायचीच... हा आता ती राख पाहण्यासाठी तू थांबणार नाहीस हेही तितकंच खरं.. पण तरीही तुझ्या पावलांचे ठसे हृदयावर उमटवून घेतलेल्या रस्त्याला अग्नी देणं चुकीचंच नाही का?             त्यापेक्षा तू रस्ता का नाही बदलत... ते फार सोपं... कुठल्या निर्जीव वस्तूला जाळल्याचे पापही नाही शिवाय नवीन रस्त्याचा अनुभव मिळेल तो वेगळाच...                                        © shivadnya

न कोणी..!!

आठवणींच्या गावी सारी  वने वणव्यात विझली; डोळ्यात कोंडले आभाळ सारे आसवे दाटून आली... अश्रूंची अमरवेल तुझ्या दारांत सजते आहे... फुलत्या कळीची तिच्या पर्वा न करीत कोणी... वाक्यांत तिच्या आज अर्धविराम आहे.... पूर्णविरामास जागा न ठेविली कोणी.... रात सरली तरी फुलत्या श्वासात कैद आहे.... गंधात तिच्या बेधुंद असा जाहला न कोणी....                       @shivadnya