Posts

Relationship check!

Image
Dear Stage रंगभूमी,           जगात अस्तित्वात असणाऱ्या काही कमाल गोष्टींंपैकी   पहिली गोष्ट म्हणजे रंगभूमी --- Stage.              कमाल एनर्जी, आयुष्यभर पुरतील आणि उरतील एवढ्या आठवणी, लक्षात राहणारा लाईट, अंगावर शहारा आणणारं म्युझिक, सावल्यांचा खेळ , ब्लॅक आऊट मधली शिस्त, धांदल धावपळ तरीही न थकता काम करणारी बॅकस्टेज ची टीम........               आणि ह्या सगळ्यांसोबत पहिल्या भेटीत जुळणारे बंध, मेकअप रूम मधला परिचयाचा गंध, पहिली घंटा, प्रेक्षक आलेत की नाहीत हे हळूच पडदा सरकवून बघणारा कलाकार, फसलेला प्रयोग, वाजलेले डायलॉग, टाळ्यांचा कडकडाट कधी नुसतीच शांतता, रंगदेवता आणि नाट्यरसिकांना सुरू झालं की पायांना सुटलेला कंप, गणपती बाप्पा मोरया म्हणत साफ केलेला आवाज, भरून घेतलेला श्वास आणि पडदा पडल्यानंतर रिकामी झालेला स्टेज.......... कमाल आयुष्य!!!!!!              आता हे सगळं लिहायचं कारण म्हणजे सोशल मीडिया वरचं रिलेशनशिप चेक चॅलेंज! आपलं रंगभूमी स...

आभाळमाया

              माणसाला नेहमी आभाळच व्हायचं असतं... अपवाद असतील काही जण नक्कीच! पण आभाळाला गाठण्याचं अप्रूप असतंच प्रत्येकाला... अगदी उंचीची भीती असणारा सुद्धा सांगतो अभिमानाने, एक दिवस आभाळाला हात टेकतील माझे. पण नाही होत असं कधी... शाब्दिक झाल्यासारखं होईल खरं हे, पण खरंच आभाळाला शिवता येईल का ओ?           जन्माला आल्यावर नाही न शिकवत कोणी ढग कापसाचे नाही वाफेचे असतात बाळ...  तोपर्यंत देवघरातला कापूसच आईने नेऊन ठेवलाय तिथे आपल्यासाठी असंच वाटतं! आईवरून आठवलं, माझ्या आईचं आणि ढगांचं फार जवळचं नातं आहे अगदी.. श्यामच्या आईसारखं तुझे पूर्वज त्या चांदण्यांत आहेत, आभाळातून तुझ्याकडे बघतायत असं कधीच सांगितलं नाही तिने... पण ती सूर्य मावळताना हातातली सगळी कामं सोडून कित्येक क्षण तशीच आभाळाकडे बघत बसून राही, ढगांचा प्रवास पाहत...        आभाळ गाठण्याची भाषा करणाऱ्या प्रत्येकाला ती सांगे अरे, आभाळातले ढग असे दुरूनच पहावेत त्याला कशाला हात लावायला हवा... तुला दिलीय की देवाने जमीन ढग बघायला..  माणसाचं घर ज...

Last call....

               माझ्या आजूबाजूची एवढी सगळी माणसं माझ्याकडे इतक्या भयंकर सहानुभूतीच्या नजरेने का पाहत होती हे मला अजूनही कळलेलं नाही. मी चोरी वगैरे तर कधी केली नव्हती पण म...

पहारा...

     बोलक्या शब्दांस मुक्या जाणिवांचा पहारा.…      बोलक्या लाटांस स्तब्ध किनाऱ्याचा पहारा...      बोलक्या बटांस सावऱ्या हातांचा पहारा...      बोलक्या ओढीस कळत्या बंधनांच...

एक निशब्द प्रवास....

एक निशब्द प्रवास.. . तिन्हीसांज वेळेचा, अस्ताबरोबर अस्वस्थतेचा आरक्त डोळ्यांनी पाहिलेल्या विरक्ततेचा... एक निशब्द प्रवास... रिक्त लेखणी आणि कोऱ्या कागदाचा जीर्ण पान आणि स...

पर्याय

                       चालत्या वाटा जाळून असा कितीसा प्रकाश मिळणार रे... आग विझली की राख ही व्हायचीच... हा आता ती राख पाहण्यासाठी तू थांबणार नाहीस हेही तितकंच खरं.. पण तरीही तुझ्...

न कोणी..!!

आठवणींच्या गावी सारी  वने वणव्यात विझली; डोळ्यात कोंडले आभाळ सारे आसवे दाटून आली... अश्रूंची अमरवेल तुझ्या दारांत सजते आहे... फुलत्या कळीची तिच्या पर्वा न करीत कोणी... वाक्य...