Posts

Showing posts from January, 2019

पर्याय

                       चालत्या वाटा जाळून असा कितीसा प्रकाश मिळणार रे... आग विझली की राख ही व्हायचीच... हा आता ती राख पाहण्यासाठी तू थांबणार नाहीस हेही तितकंच खरं.. पण तरीही तुझ्या पावलांचे ठसे हृदयावर उमटवून घेतलेल्या रस्त्याला अग्नी देणं चुकीचंच नाही का?             त्यापेक्षा तू रस्ता का नाही बदलत... ते फार सोपं... कुठल्या निर्जीव वस्तूला जाळल्याचे पापही नाही शिवाय नवीन रस्त्याचा अनुभव मिळेल तो वेगळाच...                                        © shivadnya

न कोणी..!!

आठवणींच्या गावी सारी  वने वणव्यात विझली; डोळ्यात कोंडले आभाळ सारे आसवे दाटून आली... अश्रूंची अमरवेल तुझ्या दारांत सजते आहे... फुलत्या कळीची तिच्या पर्वा न करीत कोणी... वाक्यांत तिच्या आज अर्धविराम आहे.... पूर्णविरामास जागा न ठेविली कोणी.... रात सरली तरी फुलत्या श्वासात कैद आहे.... गंधात तिच्या बेधुंद असा जाहला न कोणी....                       @shivadnya