Posts

Showing posts from April, 2021

Relationship check!

Image
Dear Stage रंगभूमी,           जगात अस्तित्वात असणाऱ्या काही कमाल गोष्टींंपैकी   पहिली गोष्ट म्हणजे रंगभूमी --- Stage.              कमाल एनर्जी, आयुष्यभर पुरतील आणि उरतील एवढ्या आठवणी, लक्षात राहणारा लाईट, अंगावर शहारा आणणारं म्युझिक, सावल्यांचा खेळ , ब्लॅक आऊट मधली शिस्त, धांदल धावपळ तरीही न थकता काम करणारी बॅकस्टेज ची टीम........               आणि ह्या सगळ्यांसोबत पहिल्या भेटीत जुळणारे बंध, मेकअप रूम मधला परिचयाचा गंध, पहिली घंटा, प्रेक्षक आलेत की नाहीत हे हळूच पडदा सरकवून बघणारा कलाकार, फसलेला प्रयोग, वाजलेले डायलॉग, टाळ्यांचा कडकडाट कधी नुसतीच शांतता, रंगदेवता आणि नाट्यरसिकांना सुरू झालं की पायांना सुटलेला कंप, गणपती बाप्पा मोरया म्हणत साफ केलेला आवाज, भरून घेतलेला श्वास आणि पडदा पडल्यानंतर रिकामी झालेला स्टेज.......... कमाल आयुष्य!!!!!!              आता हे सगळं लिहायचं कारण म्हणजे सोशल मीडिया वरचं रिलेशनशिप चेक चॅलेंज! आपलं रंगभूमी सोबतचं नातं व्यक्त करायची संधीच जणू...!!! आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी जिथे आणि जिच्यासाठी घडतायत ती रंगभूमी 'stage' . एकदा प्रेमात पड