पहारा...
बोलक्या शब्दांस मुक्या जाणिवांचा पहारा.… बोलक्या लाटांस स्तब्ध किनाऱ्याचा पहारा... बोलक्या बटांस सावऱ्या हातांचा पहारा... बोलक्या ओढीस कळत्या बंधनांचा पहारा... बोलक्या वाऱ्यास बंद खिडक्यांचा पहारा... बोलक्या अश्रूंस बंद पापण्यांचा पहारा... बोलक्या भेटींस सरत्या वेळेचा पहारा.. बोलक्या गझलेस मानी मैफिलीचा पहारा... © shivadnya