फरक....!
वार तर झेलले आम्हीही पण फरक फक्त छातीवरच्या बाणांत आणि पाठीतल्या खंजिरात होता.... सुकलेले क्षण तर पाहिले आम्हीही पण फरक फक्त कोमेजल्या पाकळ्या अन विरल्या शाईत होता.... सुरकुत्या तर पाहिल्यात आम्हीही पण फरक फक्त चुरगळल्या कागदात अन मरगळल्या देहांत होता.... जळत्या रात्री तर अनुभवल्या आम्हीही पण फरक फक्त पेटल्या शृंगार अन विझल्या विरहात होता.... @shivadnya